घरांसाठी लाभार्थ्यांना सिडको अजून पाच महिने रखडवणार
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 04, 2023
- 414
मनसेच्या आंदोलनानंतर डिसेंबर 2023 पर्यंत घरांचा ताबा देण्याचे सिडकोचे आश्वासन
नवी मुंबई : तळोजा येथील घरांसाठी सिडकोने काढलेल्या लॉटरीतील यशस्वी लाभार्थ्यांना दीड वर्ष उलटून गेले तरी घरांचा ताबा न दिल्याने ते हवालदिल झाले आहेत. एकीकडे हफ्ते भरायचे दुसरीकडे घरभाडे भरायचे अशी दुहेरी कसरत करताना त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे ही 3,800 कुटुंब मनसे सोबत सिडको भवनवर धडकले. यावेळी येत्या डिसेंबर 2023 पर्यंत सदर सोडतधारकांना घरांचा ताबा देण्याचे लेखी आश्वासन दिले.
11 सप्टेंबर 2019 रोजी सिडको मार्फत तळोजा, सेक्टर-34/36 येथील अंदाजे 8000 सदनिकांची सिडको महागृहनिर्माण योजने अंतर्गत सोडत काढून घरांची विक्री करण्यात आली. विजेत्या सोडतधारकांना 31 मे 2022 रोजी घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. शिवाय गृहसंकुल पूर्णपणे तयार झाले असून देखील आजतागायत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील सोडतधारकांना सदर घराचा ताबा मिळालेला नाही. याबाबत सिडको तारीख पे तारीख देत आहे. सिडको प्रशासनाने 24 जुलै 2023 रोजीच्या पत्रकानुसार सदर ताबा मिळण्याची तारीख 29 मे 2024 देण्यात आली आहे.
विजेत्या सोडतधारकांनी सिडकोने आखून दिलेल्या आर्थिक देयक वेळापत्रकानुसार रक्कम पूर्ण अदा केली आहे. सोडतधारकांचे गृहकर्जाचे हप्तेदेखील सुरु झाले आहेत. त्यामुळे सिडकोने सदर सोडतधारकांना तात्काळ त्यांच्या घरांचा ताबा देत त्यांची आर्थिक कचाट्यातून सुटका करण्यासाठी मनसेने सोडतधारकांसह सिडको भवनवर धडक दिली. सिडकोने सर्व आर्थिक बाबी पूर्ण झाल्यानंतर जाहीर केलेल्या तारखेला ताबा देणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता ताबा देण्यास चालढकल केल्यामुळे विजेत्या सोडतधारकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केला आहे. सिडकोने एकतर सोडतधारकांना त्वरित ताबा द्यावा किंवा ताबा देण्यास उशीर झालेल्या कालावधीची आर्थिक नुकसान भरपाई त्यांना द्यावी, अशी आग्रही मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने सिडकोकडे केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai