साडे पाच कोटींचा ऐवज मूळ मालकांना केला परत
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 18, 2023
- 296
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्हयात जप्त केलेल्या मुद्देमालाचे मुळ मालकांना हस्तांतरण करण्यात आले. वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रांत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोपींकडून जप्त केलेला एकुण 5 कोटी 41 लाखांचा ऐवज यावेळी परत करण्यात आला. हरवलेला मुद्देमाल परत मिळाल्याने मुळ मालकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.
वाशीत झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे, गणेश नाईक, महेश मालदी, प्रशांत ठाकूर, पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्या सह सर्व उच्च पदस्थ पोलीस अधिकारी व फिर्यादी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात जानेवारी 2022 ते जुलै 2023 पर्यंत नवी मुंबई पोलीसांनी मालमत्तेविरोधातील गुन्हयांत आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेले 2 कोटी 9 लाख 23 हजार तीनशे चौऱ्याऐंशी इतक्या किमतीचे सोने व रोख रक्कम एकुण 74 फिर्यादींना तर 3 कोटी 32 लाख 4 हजार नव्यानऊ इतक्या किमतीचा वाहन, मोबाईल, व इतर सर्वसाधारण मुददेमाल 174 फिर्यादींना असे एकुण 248 फिर्यादींना रु. 5 कोटी 41 लाख 27 हजार सहाशे त्रायाऐंशी इतक्या किमतीचा मुददेमाल परत करण्यात आला. यावेळी मुददेमाल परत मिळालेल्या फिर्यादीपैकी काही फिर्यादींनी मनोगत व्यक्त करून नवी मुंबई पोलीसांचे आभार मानले.
यावेळी पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमित काळे, परिमंडळ - 1 पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे, परिमंडळ 2 पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai