साबुदाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 26, 2023
- 816
आपण उपवासाला साबुदाणा खातो. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते. पण काही गोष्टीचे फायदे आहे तर तोटे देखील आहे. कोणत्याही गोष्टींचा वापर योग्य प्रमाणात करावा अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात. साबुदाणाचे जास्त सेवन केल्याचे तोटे देखील असतात.सर्वप्रथम साबुदाण्याचे फायदे जाणून घेऊ या.
ऍनिमियाला ठेवते दूर
- साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.
- उच्च रक्तदाब ठीक करते
- याच्या सेवनाने रक्ताभिसरण चांगले होते. जेणेकरुन धमन्याचे कार्य सुरळित होते आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.
ऊर्जा मिळते
साबुदाणा ब्रेकफास्टमध्ये खाण्यामुळे तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतात. दिवसभर काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते.
- मासपेशी बळकट होतात
- साबुदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते. यामुळे मासपेशी मजबूत होतात तसेच त्याची वाढही होते.
- हाडे मजबूत
- यामध्ये व्हिटामिन के आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
साबुदाण्याचे तोटे जाणून घ्या-
- जास्त साबुदाणा खाल्ल्याने मेंदू आणि हृदयाला नुकसान होते.
- यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलट्या होणे, रक्ताचे विकार, डोकेदुखी आणि थायरॉईडचा त्रास होऊ शकतो.
- याचे जास्त सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते.
- मधुमेहाचे रुग्ण असल्यास साबुदाणा न खाणे योग्य ठरेल.
- साबुदाणामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणाची शक्यता वाढते.
- साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते.
- जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही साबुदाणा खाऊ नये.
- लो बीपीचा त्रास असल्यास साबुदाणा खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकतं.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai