Breaking News
पनवेल : पुणे येथून मालवाहू ट्रक घेऊन जेएनपीटीकडे निघालेल्या ट्रकचालकाला मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल फोनसह इतर ऐवज लुटल्याची घटना पनवेलजवळ घडली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे.
कळंबोलीत राहणारा दयाशंकर मिश्रा (53) हरिओम ट्रान्स्पोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करत आहे. पुण्यातील वाघोली येथून ट्रकमध्ये माल भरून जेएनपीटी येथे निघालेले दयाशंकर यांनी सायंकाळी 7.30 वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील जेएनपीटी-पनवेल एक्झिट येथे लघुशंका करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली होती. थोड्या वेळाने पुन्हा गाडीमध्ये चढत असताना त्या ठिकाणी आलेल्या चौघांपैकी दोघांनी दयाशंकर यांना खाली खेचत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली 7 हजाराची रोख रक्कम, मोबाईल फोन, आधार कार्ड, लायसन्स व इतर ऐवज लुटला आहे. या वेळी दयाशंकर याने आरडाओरड केल्यानंतर चौघांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे दयाशंकर याने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai