Breaking News
उरण ः उरण येथून हरवलेली मुलगी मुस्कान नवनित चौधरी वय 13 वर्ष हिचा मागील दहा ते पंधरा दिवसापासून उरण पोलीस सखोल तपास करत होते. 04 ऑक्टोबर रोजी मुस्कानच्या आईच्या मोबाईल आलेल्या अनोळखी फोनवरील माहितीवरुन संशय आल्याने पोलीसांनी जळगाव गाठून मुस्कानला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
मुस्कान बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच पोलीसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. 10-15 दिवस उलटले तरी तपास सुरुच होता. दरम्यान 4 ऑक्टोबरला मुस्कानच्या आईच्या मोबाईलवर एक अनोळखी व्यक्तीने फोन करुन मुस्कानची थोडक्यात माहिती घेतली व फोन कट केला. मुस्कानच्या आई-वडिलांनी पोलीस प्रशासनाला संपर्क करून फोन केलेल्या व्यक्तीचा नंबर दिला असता सदरचा नंबर जळगाव येथील असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर लागलीच पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन जळगाव येथे रवाना झाले. सदर ठिकाणी पोलीस गेले असता मुलगी मुस्कान चौधरी ही एका बालकाश्रमात मिळून आली. मुस्कान ही तिची आई वडील रागावल्याने वृंदावन, मथुरा उत्तर प्रदेश येथे रेल्वेने जात होती त्यावेळी रेल्वे पोलिसांनी मुस्कान एकटी दिसल्याने तिला भुसावळ रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेऊन जळगाव मधील बालकाश्रमामध्ये दाखल केल्याचे उरणच्या पोलिसांना समजले. मुस्कान चौधरी ही सुखरूप तीच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai