ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 28, 2023
- 444
नवी मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर याचे गुरुवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय परंपरेतील व सातारकर फड परंपरेतील लाखोंच्या समुदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वारकरी संप्रदायचे अनेक वारकरी, सातारकर यांचे कुटुंबीय यांनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदान गाऊन साश्रू नयनांनी बाबा महाराज सातारकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
बाबामहाराज सातारकर यांचे खरं नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे होते. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यामध्ये झाला होता. बाबामहाराज सातारकरांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्तम मृदूंग वाजवायचे. बाबामहाराजांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांनाही संत वाङ्मयाची विशेष आवड होती. बाबामहाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस.सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून बाबामहाराजच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जाते. त्यांच्या कुळामध्ये 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. घराण्यात गेल्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची तसेच प्रवचनाची परंपरा बाबामहाराजांनी पुढे सुरु ठेवली. बाबामहाराज सातारकर परमार्थाचे धडे गिरवण्यासाठी ते चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांचे शिष्य झाले. वयाच्या 8 व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे.
वयाच्या 11 व्या वर्षांपासून बाबामहाराज सातारकर यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. 1950 ते 1954 या काळावधीमध्ये बाबामहाराजांनी फर्निचरचा व्यवसाय केला होता. मात्र पुढे परमार्थामध्ये स्वत:ला वाहून घेण्याचा निश्चय करीत बाबामहाराजांनी हा व्यवसाय बंद केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai