Breaking News
नवी मुंबई : अलिबागमधील मुलाने आईला जाळल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतही पोटच्या मुलाने आईची गळा दालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एकवीस वर्षीय आरोपीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. रूपचांद शेख असे या आरोपीचे नाव आहे.
कोपरी गाव सेक्टर 26 येथील गावदेवी मंदिराच्या शेजारी असलेल्या सागर भोईर इमारतीत वास्तव्याला आरोपी रूपचंद शेख हा आपली आई सलमा ऊर्फ जहानारा खातून रहेमान शेख (46) हिच्या सोबत राहतो. रविवारी कामावर जाण्यावरून दोघांत भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपी रूपचंद शेख याने घरातील उपरण्याने सलमा हिचा गळा दाबून ठार मारले. याच भागातील शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारी आरोपीची बहीण जास्मीन राभरोस ताती (23) हिला हा प्रकार समजताच तिने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस उपायुक्त यांच्यासह एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुधाकर ढाणे तसेच सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, अशोक डमाळे आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पहाटे 6:21 वाजता याप्रकरणी भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी रूपचांद शेख याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अशोक डमाळे अधिक तपास करीत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai