शरद पवारांची पुन्हा पावसात सभा
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 29, 2023
- 301
नवी मुंबई ः शरद पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरलेली नाही. त्या सभेनंतर साताऱ्यातली राजकीय गणितं बदलली, शरद पवारांना मतदारांकडून सहानुभूती मिळाली. 26 नोव्हेंबरला पुन्हा एकदा शरद पवारांची तशीच सभा नवी मुंबईत पाहायला मिळाली. पवार यांनी नेरूळ येथे भर पावसात भाषण केले.
नेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद पवार उपस्थित होते. पाऊस आणि जोराचा वारा वाहत असल्याने येथेही साताऱ्याची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सभास्थळी सुरु होती. या मेळाव्यात 300 पेक्षा अधिक बचत गटांना सहभाग घेतला होता. शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पवारांनी त्यांना नाराज न करता भाषण केलं. साताऱ्यातल्या सभेत दिसलेला शरद पवारांचा तोच जोश, तोच उत्साह आणि तीच आक्रमकता आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
महिला बचत गट आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, आज अनेक महिलांनी, त्यांच्या संघटनांनी चांगले स्टॉल्स उभे केले आहेत. पावसामुळे थोडी निराशा झाली. परंतु, माझं एवढंच सांगणं आहे की निराशा हा विषय तुमच्या मनात कधी येऊ देऊ नका. आपण निराशेवर मात करू, संघर्ष करू. धैर्याने पुढे जाऊ आणि हा कार्यक्रम राबवण्याचा निर्धार करुया जोमाने कामाला लागा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai