ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2023
- 280
नवी मुंबई ः क्रेडाई-बानमच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्यावतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे बांधकाम आणि विविध क्षेत्रातील व्यवसायिक यांच्यासह विविध मान्यवरांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ आणि सात्विक उत्पादने घेतली. अनेकांनी यावेळी साधना, वास्तूशुद्धी आदी विषयांवर शंकानिरसन करुन घेतले, तसेच दैनंदिन जीवनात धर्माचरण आणि साधेनसाठी करावयाचे प्रयत्न आणि कृती सुद्धा समजून घेतल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai