
कांद्याच्या निर्यातीवर बंदी
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 09, 2023
- 417
मुंबई ः केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि किमती नियंत्रणात राहण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुढील वर्षी मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. आज परदेशी व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कांद्याच्या निर्यात धोरणात 31 मार्च 2024 पर्यंत मोफत निर्यात प्रतिबंधित करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
डीजीएफटीने असेही म्हटले आहे की, त्यांच्या विनंतीवरून सरकारने दिलेल्या परवानगीच्या आधारे इतर देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली जाणार आहे. या अधिसूचनेनुसार, निर्यातबंदी अधिसूचनेपूर्वी ज्या कांद्याची लोडिंग सुरू झाली होती, अशा कांद्याची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- किती टन कांदा निर्यात झाला?
आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 4 ऑगस्टदरम्यान देशातून 9.75 लाख टन कांद्याची निर्यात झाली असून, त्यात बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख आयातदार देश आहेत. 14 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये भाज्यांची महागाई 21.04 टक्के आणि बटाट्याची 29.27 टक्क्यांपर्यंत घसरली, परंतु कांद्याचा वार्षिक दर वाढीचा दर 62.60 टक्के इतका उच्च राहिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai