Breaking News
उरण ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातुन रात्रीच्यावेळी मोठया प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनातील बॅटरी चोरी, घरफाडी, ट्रान्सफार्मर मधील वांयंडींग कॉपर वायर, ऑईल इतर चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. यातील आरोपींचा शोध घेण्यात न्हावा शेवा पोलिसांना यश आले आहे. दोन सराईत आरोपींना अटक केली असून 7 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांच्याकडून साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाढत्या चोरीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच आरोपींचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलींद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -2 पनवेल पंकज डहाणे, व सहा. पोलीस आयुक्त, पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गांना दिले होते. या आदेशाची त्वरित अंमलबजावणी न्हावा शेवा पोलिसांनी केली आहे.
न्हावाशेवा पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी 2024 मध्ये जे.एन.पी.ए. टाऊनशिप सेक्टर 3 येथील बिल्डींग क. ए. 18 मधील 11 व 12 या सदनिकांमध्ये ठेवलेली शासकीय कागदपत्रे चोरी करून नेलेबाबत न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी मैनुद्दीन इलियास खान, (35) व छोटु रामतीरथ केवट (39) दोघं रा.उत्तर प्रदेश यांना शिताफिने पकडुन त्यांचेकडे नमुद गुन्हयांचे व्यतिरिक्त न्हावाशेवा पोलीस ठाणेच्या हद्दीत इतर 7 गुन्हे केलेले असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. आरोपी यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेला मुद्देमाल व चोरी करणेसाठी वापरलेले वाहन असा एकुण 3,50,000 रकमेचा मुद्देमाल न्हावाशेवा पोलीसांनी हस्तगत केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai