Breaking News
एकाच रात्री चार घरे फोडली; दागिने आणि रोक रक्कम घेऊन चोरटे पसार
उरण ः जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरे फोडली. घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला. चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावात एकाच रात्री चोरट्याने चार घरात घरफोडी केल्याने चोरांटी दहशत पसरली आहे. या घटनेतील दोन घरांतील लोक रात्रपाळीसाठी गेली असल्याने ती घरे बंद होती. तर दोन घरातील कुटुंब घरातच झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी या चार घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा कटरने तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे लाँक तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रांजणपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे यांनी उरण पोलीसांना झालेल्या घटनेची माहिती दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून तात्काळ घडलेल्या घरफोडीचे पंचनामे केले. सदर चोरटे हे गावातील सीसीटिव्ही कँमेरात कैद झाल्याने लवकरात लवकर चोरटे जेरबंद केले जातील असे आश्वासन पोलीसांनी दिले आहे. मात्र या अगोदर ही रांजणपाडा गावातील श्री हनुमान मंदीरात चोरीची घटना घडली होती. त्या चोरीचा तपास आजतागायत न लागल्याने सध्या रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai