रा.बौ.दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेमध्ये विविध कार्यक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 13, 2023
- 406
नवी मुंबई ः खारघर येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, नवी मुंबई या संस्थेचा जागतिक दिव्यांग दिन शनिवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या दिनाचे औचित्य साधून दिव्यांग जन-जागृतीसाठी खारघर मधील उत्सव चौक ते सेक्टर-5 परिसरात 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. या प्रभात फेरीत बौद्धिक दिव्यांग मुले, त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. मुलांनी प्रभात फेरीमध्ये वेगवेगळ्या दिव्यांगाच्या माहिती विषयी बहुभाषिक संदेशांचे फलक हाती घेतले व घोषणाही दिल्या. ही प्रभात फेरी संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
5 डिसेंबर 2023 रोजी संस्थेमध्ये युनानी मेडिसिन क्षेत्रीय रिसर्च संस्थेमार्फत मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. निखत शेख, डॉ. जीहुरामन आणि डॉ नोमन हे आले होते. सुमारे 110 बौद्धिक दिव्यांग मुलांची तपासणी करण्यात आली. व त्या संबंधित औषधे देण्यात आले. ही मेडिकल तपासणी डॉ. वसीम अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 6 डिसेंबर रोजी संस्थेमध्ये ऍबिलिटी मेला चे आयोजन करण्यात आले होते. हा मेला हेलन केलर इन्स्टिटयूट महापे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या ऍबिलिटी मेला चे उदघाटन करण्यासाठी प्रमुख अतिथी प्राध्यापक (डॉ) गौतम गवळी, संचालक अमिठी विद्यापीठ मुंबई कॅम्पस, अनुराधा बाकची प्राचार्य हेलन केलर इन्स्टिटयूट फॉर डिफ आँफ ब्लाइंड महापे, नूर एस बी आई फाऊंडेशन आणि एम. प्रकाश माजी अध्यक्ष रोटरी क्लब हे उपस्थित होते. ह्या मेलमध्ये दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांकडून सुमारे 54 स्टॉल्स लावण्यात आले होते.
या मेला मध्ये नवी मुंबई क्षेत्रातील विशेष शाळांनी भाग घेतला होता. येथे विविध वस्तूंचे तसेच खाण्याचे स्टॉल दिव्यांग मुले व पालकांकडून लावण्यात आले होते. तसेच दिव्यांग मुलांनी आपली प्रतिभा नृत्य, गाणे, नाटक या विविध कार्यक्रमांमधून दाखवली गेली. यामध्ये एकुण 39 दिव्यांग मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये बौद्धिक दिव्यांगजन मुले व त्यांचे पालक, प्रशिक्षणार्थी तसेच संस्थेचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यानंतर संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर यांनी दिव्यांगजन सशक्तीकरण या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले, व संस्थेच्या भविष्यातील उपक्रमाविषयी माहिती दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai