आठ किलोचा गांजा जप्त
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 30, 2019
- 586
नवी मुंबई : उलवे व एनआरआय परिसरात गांजा या अमली पदार्थाची विक्री करणार्या माणिक जयराम रुडे (32) या व्यक्तीला परिमंडळ 1 मधील अमली पदार्थविरोधी विशेष पथकाने उलवे भागात सापळा रचून अटक केली. त्याची गाडी आणि घरामधून पोलिसांनी सात किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
अमली पदार्थ विरोधी विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांचे पथक नेरुळ परिसरात गस्त घालत असताना, त्यांना नेरुळ सेक्टर तीनमधील ममता माने उद्यानात इस्माइल सलिम राजपूरकर (20) व अब्बास इब्राहिम मोहम्मद शेख (33) हे दोघे अमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आले. त्यांना अटक केल्यावर उलवे भागात राहणारा माणिक हा गांजा पुरवित असल्याचे त्यांनी सांगितले.
माणिक हा उलवे भागात गाडीमधून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने माणिक रुडे राहत असलेल्या घराजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीची तपासणी केली असता, त्याच्या गाडीमध्ये एका बॅगेमध्ये दोन किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्येही पाच किलो 900 ग्रॅम गांजा सापडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला एनडीपीएस कलमाखाली अटक करून सात किलो 900 ग्रॅम गांजा व त्याची स्विफ्ट गाडी, असा सुमारे पाच लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने त्याला येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. माणिक हा उलवेसह आजूबाजूच्या परिसरात अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai