वाशीत मोफत दाखल्यांचे वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 22, 2023
- 321
सुमारे 350 नागरिकांनी घेतला लाभ : विविध दाखल्यांचे वितरण
नवी मुंबई : वाशीतील प्रभाग क्रमांक 62 मधील ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे मंगळवार दि. 19 डिसेंबर रोजी मोफत वाटप करण्यात आले. भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अंजली अजय वाळुंज व समाजसेवक विजय वाळुंज यांनी सेक्टर 16 येथील कर्मवीर भाऊराव पाटील उद्यानमध्ये या वितरण शिबिराचे आयोजन करण्यात केले होते.
प्रभागातील नागरिकांच्या सोयीकरिता माजी नगरसेविका अंजली वाळुंज व समाजसेवक विजय वाळुंज यांनी गेल्या महिन्यात विविध शासकीय दाखल्यांच्या मागणी संदर्भात नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. प्रभागातील नागरिकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला होता. आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, सीनियर सिटीजन कार्ड, डोमासाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला इत्यादी विविध शासकीय दाखल्यांसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना या वितरण शिबिरामध्ये मोफत दाखले वाटप करण्यात आले. प्रभागातील सुमारे 350 नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी नागरीकांकडून आलेल्या सूचना व समस्यांबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai