Breaking News
जुनं वर्ष 2023 संपून नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काहीच तास राहिले आहेत. नवीन वर्ष म्हटलं की अनेकजण नवीन संकल्प करतात. हा आता बरीच जण केलेले पुर्ण करत नाहीत ही वेगळी गोष्ट पण संकल्प करतात हे महत्वाचं! पण काही संकल्प जर तुम्ही मनापासून केलेत तर तूम्हाला भविष्यात याचा नक्की फायदा होईल. आर्थिक, आरोग्य आणि कुंटुंब या तिघांची सांगड घातली तर संकल्प पुर्ण करण्याचे बळ मिळेल. पण या सर्वांसाठी ईच्छाशक्ती असणे तेवढेच गरजेचे आहे. स्वतःवर काही बंधने, काही तत्व नित्य नियमाने पाळणे आवश्यक आहे तरच त्यात यशस्वी व्हाल. त्यामुळे भविष्य सुरक्षितस निरोगी हवे असेल तर आजच म्हणजे वर्तमानातच तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत आणि ते फळाला नेण्यासाठी पाठपुरावाही केला पाहिजे. आज आपण असे काही संकल्प पाहणार आहोत जे तुम्ही सहज रोजच्या व्यवहारात करु शकता. आता यासाठी नियोजन मात्र तुमचे तुम्हालाच करावे लागेल हे मात्र नक्की.
जीवनात पुढे जाण्याचा मूळ मंत्र म्हणजे कष्टाबरोबरच शिकत राहणं खूप गरजेचं आहे. या वर्षी, असा संकल्प करा की ज्यातून तुम्हाला काही नवीन कौशल्य शिकायला मिळेल. या नवीन कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. तसेच, आयुष्यात प्रगती करू शकता.
प्रत्येक वेळी आपण नवीन वर्षासाठी दृढ हेतू करतो, परंतु आपल्या योजनांवर योग्यरित्या कार्य करण्यास आपण अक्षम राहतो. जर्नल ऑफ क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, केवळ 46% लोक त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण वर्षभर पाळण्यास सक्षम राहतात. याचा अर्थ असा की नवीन वर्षासाठी ध्येय निश्चित करणाऱ्या निम्म्याहून कमी लोक त्यात यशस्वी होतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाचे सर्वोत्तम संकल्प घेऊन आलो आहोत जे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेऊन सहज पूर्ण करू शकता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai