Breaking News
2024 या वर्षांमध्ये मकरसंक्रांती 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांत ही नेहमी 14 किंवा 15 जानेवारीला साजरी होत असते परंतु मागच्या दोन वर्षापासून मकरसंक्रांती ही 15 जानेवारी या दिवशी साजरी केली जात आहे. संक्रांत हे प्रत्येक महिन्यात साजरी होत असते परंतु मकरसंक्रांत ही सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करायचे संक्रमण दाखवते आणि ही वर्षातली सर्वात मोठी संक्रांत साजरी केली जाते.
15 जानेवारी 2024 या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. दिनांक 15 जानेवारी 2024 या दिवशी मध्यरात्रीपासून दोन वाजून 42 मिनिटांनी मकर संक्रांतीला सुरुवात होणार आहे. म्हणूनच उदय तिथीनुसार मकरसंक्रांत हे 15 जानेवारी 2024 या दिवशी साजरी होणार आहे.आता उदय तिथी म्हणजे काय तर उदय तिथी म्हणजे जी तिथी सूर्याच तोंड बघते अशा तिथीला उदय तिथी असे म्हटले जाते.
14 जानेवारी 2024 या दिवशी धनुर्मास समाप्ती असून भोगी हा सण साजरा केला जातो.भोगीच्या दिवशी तीळ घालून मिश्र भाजी केली जाते. बऱ्याच ठिकाणी खिचडी देखील बनविले जाते. मिश्र भाजी सोबत बाजरीच्या भाकरी तीळ दाणे लावून बनविले जातात. 15 जानेवारी 2024 मकरसंक्रांती संक्रमण पुण्यकाळ सकाळी 07.17 ते संध्याकाळी 06.20
16 जानेवारी 2024 या दिवशी किंक्रांत साजरी केली जाणार आहे. किंक्रांत ज्या दिवशी असते त्या दिवशी कोणतेही शुभ काम केले जात नाही. किंक्रांतला “करी दिन” असे देखील म्हटले जाते.
संक्रांत 2024 कशावर आहे?
प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच वाहन हे बदलत असतं.2024 या वर्षी मकर संक्रांतीचे वाहन घोडा असणार आहे तर उपवाहन हे सिंहीन असणार आहे. त्याचबरोबर काळे वस्त्र घातलेले असून हातामध्ये भाला देखील आहे आणि कपाळावर हळदीचा टीका आहे. वयाने अगदी वृद्ध असून हातामध्ये दुर्वा घेतलेल्या असून नाव महोदरी आहे. संक्रांत पूर्व दिशेकडे जात असेल नैऋत्य दिशेकडे बघत आहे.
प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होत असते. हे राशी परिवर्तन जे घडत असते या प्रक्रियेला “संक्रांत” असे म्हटले जाते. अशी प्रक्रिया करत करत बारा महिन्यांमध्ये बारा संक्रांती येतात त्यामध्ये मकर संक्रांत हे सर्वात मोठी असते. संक्रांती म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करणे होय. तर मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजेच “मकर संक्रांत” होय.
या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्यात येते.
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाचे उत्तरायण होते यामुळे सूर्य देवाची पूजा केल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लाभ आपल्याला होत असतात. यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नक्कीच सूर्य देवाची पूजा करा, यामुळे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी, शांतता नांदेल. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, श्राद्ध आणि पुण्य केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते, त्याचबरोबर असे केल्यास आपण केलेले विशिष्ट प्रकारच्या कामांमध्ये सफलता प्राप्त होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai