मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात विविध कार्यक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 15, 2024
- 416
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 19 डिसेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून मान्यवरांच्या व्याख्यानांसोबत अधिकारी, कर्मचारीवृंदामधील मराठी साहित्यप्रेमाला वाव देत नानाविध स्पर्धा उपक्रम संपन्न होत आहेत.
या कार्यक्रमांतून संपन्न मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा अशाप्रकारे पंधरवडा कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवार, 15 जानेवारी रोजी सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते प्रा.प्रवीण दवणे यांच्या मायबोली मराठी या विषयावर उपस्थितांशी ह्रदयसंवादाने होणार असून सकाळी 11 वा. नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक, नाटककार आणि ललित लेखक प्रल्हाद जाधव यांचे कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर या अनुषंगाने वाणी, भाषा, लेखणी (शासकीय कामकाजातील यशाची त्रिवेणी) या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, 19 जानेवारीला सायं, 4 वा. लेखक, निवेदक डॉ. मृण्मयी भजक या ‘अमेरिका खट्टी मीठी' या नाट्य अभिवाचनात्मक कार्यक्रमातून मराठी चष्म्यातून आंबटगोड अमेरिकेची सफर घडविणार आहेत. या सोबतच नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग असावा यादृष्टीने त्यांच्याकरिता 3 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला स्पर्धा उपक्रम मंगळवार, 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राबविला जात असून यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नमुंमपा अधिकारी-कर्मचारी यांची ‘माझे संविधान माझा अभिमान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये 5 मिनिटे कालावधीत आपले विचार मांडायचे आहेत. याशिवाय दुसऱ्या स्पर्धा उपक्रमांतर्गत 25 जानेवारी रोजी परकाव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदाने स्वतःच्या नव्हे तर इतर कवींच्या आवडत्या कवितेचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai