
ठाकरेंच्या याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 17, 2024
- 313
नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच निकाल जाहीर केला. पण हा निकाल विरोधात गेल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आता सोमवारी 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याबाबत ठाकरेंच्या वकिलांनी सरन्यायाधिशांकडे विनंती केली आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना विनंती केली की, आपली सुनावणी शुक्रवार ऐवजी सोमवारी ठेवण्यात यावी. त्यामुळे आता ही सुनावणी सोमवार, 22 जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल नार्वेकरांकडे सर्व पुरावे सादर करुनही शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील 16 आमदारांवर घटनेतील 10 व्या अनुसुचीनुसार अपात्र ठरवण्यात आलेले नाही, अशी तक्रार करत ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी या याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंतीही यामध्ये करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना असून त्यांचा व्हिप भरत गोगावले हाच खरा व्हिप असल्याचं म्हटलं. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेचा व्हिप सुनील प्रभूंचा व्हिप शिदेंच्या 16 आमदारांविरोधात लागू होत नाही. त्यामुळं ते अपात्र ठरत नाहीत. तसेच गगावलेंनी काढलेला व्हिप चुकीच्या पद्धतीनं आमदारांपर्यंत गेला त्यामुळं ठाकरे गटाचेही आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल नार्वेकरांनी दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai