कोंकण विभागीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 26, 2024
- 391
नवी मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 वा वर्धापन दिनाचा कोकण विभागीय स्तरावरील ध्वजारोहण समारंभ आज कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई पोलीस मुख्यालय मैदान, सेक्टर-17, कळंबोली येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना विभागीय आयुक्तांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, पोलीस सहआयुक्त संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी परेड कमांडर गजानन राठोड ,सहा.पोलीस आयुक्त तर्भे, शांताराम वाघमोडे, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय नवी मुंबई, एस.आर.पी.एफ,ग्रुप नं.11 प्लाटून, क्यु .आर.टी.पथक, नवीमुंबई, आर.सी.पी.पथक, नवीमुंबई, नवी मुंबई पोलीस पथक, नवी मुंबई महिला पोलीस पथक, नवी मुंबई वाहतूक पोलीस पथक, डॉग स्कॉड बॉम्ब शोधक/नाशक पथक, बँड पथक, वरुन वाहन, वज्रवाहन, निर्भया पथक इरटिगा, फायर बुलेट, निर्भया पथक ॲक्टीव्हा, अग्निशामक रेस्क्यु व्हॅन सिडको आदीनी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रम प्रसंगी देशाच्या सीमेवर आहोरात्र सज्ज अशा सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ‘थल सेना दिवस (आर्मी डे)' निमित्त आयोजित रक्तदान शिबीर केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. शासकीय/निमशासकीय माजी सैनिक संघटना (कोंकण विभाग) संस्थापक अध्यक्ष रमेश जैद, राज्यकर सह आयुक्त, अपील कोकणभवन विभाग (सेवानिवृत्त) तथा सदस्य विक्रीकर न्यायाधीकरण मुंबई यांचा व अजीत व. न्यायनिरगुडे शासकीय/निमशासकीय माजी सैनिक संघटना (कोंकण विभाग)अध्यक्ष यांना शुभेच्छा पत्र देऊन उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागतर्फे पाच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम टोपली कवायत, महाराष्ट्र दर्शन, देशभक्तीपर गीत, कवायत, लेझीम नृत्य सादर केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai