Breaking News
नवी मुंबई : वाशीमध्ये भरदिवसा दोन बंद घरांमध्ये घरफोडी करून चार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरण्यात आले आहेत. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
वाशी सेक्टर-16 मध्ये राहणारे संजय रामकृष्णन (47) हे व्यावसायिक उलवेतील भावाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी रामकृष्णन यांच्या घरातील पावणेचार लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. रामकृष्णन यांच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांनी रामकृष्णन यांना संपर्क साधला होता. यावेळी चोरट्यांनी रामकृष्णन यांच्या शेजारील बिल्डिंगमध्ये राहणारे त्यांचे मित्र सचिन निमगरे यांच्या घराचे लॉक उचकटून सोन्याचे दागिने, कॅमेरा असा 30 हजारांचा ऐवज चोरला आहे. त्यामुळे दोन्ही घटनांप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai