कोंकण विभागात मराठा आरक्षण सर्वेक्षण पूर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 07, 2024
- 496
नवी मुंबई : महसूल यंत्रणेसोबत इतर विभागांच्या मदतीने कोकण विभागात मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण झाले आहे. अशी माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली होती. 23 जानेवारी पासून सुरु झालेल्या या मोहीमेत महसूल यंत्रणेसह इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते. अंगणवाडी सेविका, माध्यमिक आणि प्राथमीक शाळेचे शिक्षक, महानगरपालिकेचे कर्मचारी असे जवळपास साडेचार लाख प्रगनक महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या मोहीमेसाठी राज्यभर काम करत होते. तर 200 हून अधिक डेटाबेस सेंटर सुरू होते. सर्वेक्षणासाठी खास सॉफ्टवेअरही तयार करण्यात आलं होत. 02 फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजता हे सर्वेक्षण संपल असून, कोकण विभागात हे सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण झाल आहे. या सर्वेक्षणात संकलीत केलेली माहिती मागासवर्ग आयोगाकडे सादर करण्यात येईल. यावरून अहवाल तयार केला जाईल आणि तो शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai