पालिकेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2024
- 242
नवी मुंबई ः नुकत्याच 31 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत विज्ञान प्रकल्प स्पर्धेमध्ये 36 जिल्हयांतील 45 हजारहून अधिक विदयार्थी प्रकल्पाची नोंदणी झाली होती. त्यामधून 30 प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली असून त्यामध्ये नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक 46, गोठीवली शाळेतील प्रिती राठोड व पल्लवी सोळंके या दोन विदयार्थिनींनी साकारलेल्या अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे.
दोन्ही विदयार्थिनींचा महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या दोन विदयार्थिनींनी तयार केलेल्या ‘विल्हेवाट लावता येणारे महिलांचे लघवीचे साधन' या प्रकल्पाची तालुका पातळीवरुन जिल्हा पातळीवर व पुढे जिल्हा पातळीवरुन राज्य पातळीवर आणि त्यापुढे राष्ट्रीय पातळीवर निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे गोठीवली शाळेतीलच अंश शर्मा व विलास गुरव या दोन विदयार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बहुउपयोगी खुर्ची' या प्रकल्पाची महापालिका स्तरावर महापालिका स्तरावर उत्त्म प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.
- दोन विद्यार्थिनीं रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने विविध खेळांत नैपुण्य असणाऱ्या नमुंमपा शाळेतील विदयार्थ्यांना उत्त्म दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध् करुन दिले जात आहे. यामधील रायफल शुटींग या ऑलिपिंक स्तरावरील मान्यताप्राप्त खेळाच्या प्रशिक्षण सुविधा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या नुतन चौधरी व अंशिका प्रजापती या दोन नमुंमपा शाळेतील विदयार्थिनींना त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे व्यासपीठावर उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai