शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी व सहकाऱ्यांची शिवरायांना शाहिरी वंदना
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 21, 2024
- 765
नवी मुंबई ः ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संपन्न होणारी विचारवेध या व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमात देशातील नामवंत व्याख्याते व कलावंतांनी महामानवांच्या दिशादर्शक विचारांचा जागर केला आहे. या शृंखलेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्तरसंध्येला सुप्रसिध्द शाहीर डॉ. देवानंद माळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवराय, बाबासाहेब व इतर महामानवांच्या जीवनावर व विचारांवर आधारित शाहिरी कवने सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शिवछत्रपतींवरील पोवाडयाने दमदार सुरुवात करीत शाहीर डॉ. देवानंद माळी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज तसेच इतर महामानवांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित एकाहून एक सरस स्फूर्तीगीते सादर केली. हे वेगळेपण अधोरेखित करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या मनोगतात आज अत्यंत वेगळे पोवाडे व शाहिरी गीते ऐकायला मिळाली याचा विशेष उल्लेख केला. ज्ञानस्मारक म्हणून नावाजल्या जाणाऱ्या या स्मारकात अनेक दिग्गज व्याख्यात्यांनी आत्तापर्यंत शब्दांतून वैचारिक जागर केला, तसाच जागर डॉ. देवानंद माळी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज गीतांमधून केला. तो विचार स्वर-संगीतातून मनात घेऊनच इथे असलेला प्रत्येक रसिक घरी जाईल अशा शब्दात आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले.
शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी यांच्यासह युवा शाहीर पृथ्वीराज माळी, शाहीर चंद्रीका कल्पना माळी, बालशाहीर हर्षवर्धन माळी व शौर्यराज माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध गीते शाहिरी ढंगात सादर करीत छत्रपती शिवरायांसह महामानवांना स्वरवंदना अर्पण केली. शाहीर सम्राट डॉ. देवानंद माळी यांनी नवी मुंबईतील बाबासाहेबांचे स्मारक पाहून हरकून गेलो असे सांगत येथील ग्रंथालय, चित्रसंग्रहालय व सर्वच सुविधा उत्कृष्ट असल्याचे मत व्यक्त करीत हे बाबासाहेबांच्या विचारांचे ज्ञानस्मारक असल्याचे म्हटले. याठिकाणी कार्यक्रम करायला मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असून महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी कार्यक्रम करत असताना येथील विचारवंत प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दिलेली दाद पाहून खूप आनंद मिळाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai