Breaking News
चार आरोपींपैकी तीन महिला
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत तब्बल 36 लाख 20 हजारांचे विविध अंमली पदार्थ जप्त केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही घटनांत महिलांचा सहभाग आढळून आला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी तीन महिला आहेत तर एक आरोपी फरार असून तीसुद्धा महिलाच आहे.
कोपरखैरणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणारी टोळी उद्ध्वस्त केली असून तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 32 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ साठवणे आणि विकणे सुरू असल्याच्या माहितीवरून कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील नॅशनल अपार्टमेंट, चौथ्या मजल्यावर, सदनिका कमांक 404 मध्ये 16 तारखेला पोलीस पथकाने छापा घातला. त्यावेळी मोहम्मद शमिम ईस्माईल अन्सारी उर्फ सॅम, वय (27) खालीदा खातून मोहम्मद अजीम अन्सारी (23) आणि आफिया खातुन हयात मोहम्मद अन्सारी (19) हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची अंगझडती व घराची झडती घेतली असता अमली पदार्थ मिळून आले. त्यामुळे गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करण्यात आली. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात आरोपींकडून 6 लाख 30 हजार रुपये किमतीची 63 ग्रॅम वजनाची एम.डी. पावडर, 25 लाख 30 हजार रुपयांची 253 ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर पावडर व रोख रक्कम 12 हजार 980 असा एकूण 31 लाख 72 हजार 980 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai