73 हजार बालकांना पल्स पोलिओ लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 05, 2024
- 463
नवी मुंबई ः महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या 24 नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, टोल नाके इत्यादी विविध ठिकाणी 609 स्थायी, 93 ट्रांझिट व 27 फिरते मोबाईल असे एकूण 729 पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. याठिकाणी 73283 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.
‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांच्या मार्फत पोलिओ लसीकरण मोहीमेची जनजागृती करून पोलिओ लसीकरणाची माहिती पोहचविण्यात आली. लसीकरण बूथवरील 02 हजारहून अधिक कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. सदर दिवशी नमुंमपाचे 80% इतके काम झाले आहे. 100% लाभार्थींना पल्स पोलिओ लस मिळावी याकरिता 04 ते 09 मार्च 2024 या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या बालकांना रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही, अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात असून घरांना भेट देणाऱ्या नमुंमपा मार्फत येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai