तुर्भे विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2024
- 318
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टीने प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात येत आहेत. 06 मार्च 2024 रोजी तुर्भे विभाग कार्यलयामार्फत विभाग अधिकारी भरत धांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वच्छता अधिकारी राजूसिंग चव्हाण यांच्या सूचनेनुसार विभागात ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकून उपद्रव करणाऱ्या व्यावसायिकांवर, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, संतोष देवरस, विष्णू रावते, हनुमान मेश्राम, योगेश पाटील, विजय दुर्लेकर यांच्या पथकाने दंडात्मक शुल्क रक्कम रू. 6750 वसूल केली व त्यासोबत 6 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जमा केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai