कल्याण-तळोजा मेट्रो कामाचे भुमिपुजन
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2024
- 397
2027 अखेरपर्यंत काम पुर्ण होण्याचा अंदाज
मुंबई : ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले. डोंबिवलीतील प्रीमियर मैदानातील एका सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे कामाचा आरंभ करण्यात आला.
एमएमआरडीएच्या 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मेट्रो 12 प्रकल्प. 22.173 किमी लांबीची कल्याण-तळोजा अशी ही मार्गिका असून या मार्गिकेवर 19 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या मेट्रो स्थानकांचा यात समावेश आहे. ही मेट्रो मार्गिका ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेची विस्तारीत मार्गिका आहे. त्यामुळे मेट्रो 12 मार्गिकेमुळे ठाणे आणि नवी मुंबई ही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजीत किंमत सुमारे 5,865 कोटी रुपये इतकी असून ह काम 2027 अखेरपर्यंत पुर्ण होण्याचा अंदाज आहे. हा मार्ग सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मेट्रो 12 मार्गिकेसाठी नवी मुंबईतील पिसार्वे येथील एका खासगी जागेवर कारशेड प्रस्तावित करण्यात आले होते. खासगी मालकीची आहे. ती जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, तसेच त्यासाठी बराच निधी लागणार असल्याने एमएमआरडीएने कारशेडसाठी नवीन जागा शोधली आहे. त्यानुसार निळजे-निळजेपाडा येथे अंदाजे 45 हेक्टर जागा शोधून ती ताब्यात घेण्यात आली आहे.
मेट्रो मार्गिकेचे काम सुरु होण्यापूर्वीच कारशेडचा प्रश्न मार्गी लागलेली ही पहिली मार्गिका आहे. या मार्गिकेच्या कामासाठी गावर कन्स्ट्रक्शन लिमिटेड, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि वेल्सपून इन्टरप्रायझेस लिमिटेड या तीन कंपन्यांकडून निविदा सादर करण्यात आल्या होत्या. त्यात गावर कन्स्ट्रक्शन लि.ने बाजी मारली आहे. या कंपनीला कंत्राट दिले आले असून कामास सुरुवात झाली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai