Breaking News
नवी मुंबई ः अमली पदार्थ विरोधी पथकाने पळस्पे येथे सापळा रचून दोघांकडून 6 लाख 88 हजार रुपये किमतीचा 34 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पळस्पे परिसरात दोघेजण गांजाच्या व्यवहारासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक निलेश धुमाळ, उपनिरीक्षक कुलदीप मोरे, उत्तम लोखंडे, विजय पाटील, संजय फुलकर आदींचे पथक केले होते. या पथकाने गुरुवारी रात्री पळस्पे परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये संशयित वर्णनाची कार अडवून कारमधील दोघांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर संशय आल्याने कारची झडती घेतली असता, कारमध्ये दोन बॅगमध्ये भरून ठेवलेला 34 किलो 400 ग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावानुसार त्याची किंमत 6 लाख 88 हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांवर नवीन पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील कार देखील जप्त करण्यात आली आहे. तर या दोघांच्या माध्यमातून पुढील सूत्रधारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai