ऑनलाइन बांधकाम परवान्यांसाठी नियम्स
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 03, 2019
- 617
नवी मुंबई ः सिडकोतर्फे नैना क्षेत्रातील ऑनलाइन बांधकाम परवान्यांसाठी 2 डिसेंबर, 2019 रोजी लोकेश चंद्र यांच्या हस्ते नियम्स (छखचड-छAखछA खपींशसीरींशव र्ििीेींरश्र चरपरसशाशपीं डूीींशा) प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. नियम्स प्रणाली हे डिजीटल भारत व ई-प्रशासन या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सिडकोने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे उद्गार लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांनी याप्रसंगी काढले.
नियम्स प्रणाली ही सिडकोची कोपास प्रणाली नंतरची दुसरी प्रणाली असून नैना प्रकल्पाची अंमलबजावणी होत असतानाच ही प्रणाली कार्यान्वित होणार असल्याने नागरिकांना सुलभ व पारदर्शक पद्धतीने बांधकाम परवाना आणि विहित कालावधीत बांधकाम परवाना प्राप्त होणार आहे. तसेच व्यवहार सुलभतेचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनेही हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे, असे लोकेश चंद्र यांनी यावेळी बोलताना सांगितले. या प्रसंगी विजय गुप्ता, सल्लागार, सॉफ्टटेक यांनी उपस्थितांसमोर नियम्स प्रणालीचे संक्षिप्त सादरीकरण केले. त्यानंतर लोकेश चंद्र यांच्या हस्ते बांधकाम परवाना प्रस्ताव लाईव्ह सादर केलेल्या दोन बांधकाम धारकांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
नैना प्रकल्प क्षेत्रातील बांधकामविषयक परवानगी देण्याचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने सिडकोकडे आहेत. नैना क्षेत्रात बांधकाम परवाना प्राप्त करण्याशी संबंधित विविध प्रक्रिया या अधिक सुलभ, जलद व पारदर्शकरीत्या पार पडाव्यात याकरिता सिडकोतर्फे नियम्स प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आली आहे. नियम्स प्रणालीचा प्रारंभ करण्यात आल्याने यापुढे नैना क्षेत्रात बांधकाम परवान्याशी संबंधित अर्ज, शुल्क भरणा, परवानगी प्रदान करणे इ. सर्व प्रक्रिया या केवळ ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. सिडकोच्या अधिकृत संकेस्थळावर ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्याकरिता स्वतंत्र टॅबही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नैना क्षेत्रामध्ये बांधकाम परवाना प्राप्त करण्याकरिता इच्छुक असलेले बांधकाम धारक/ वास्तुविशारदांकरिता नियम्स प्रणालीच्या वापराबाबत कार्यशाळांचे व त्यानंतर हॅन्डस ऑन ट्रेनिंगचे आयोजनही सिडकोतर्फे करण्यात आले होते. तसेच याबाबतच्या मार्गदर्शनाकरिता नैना विभागा अंतर्गत स्वतंत्र मदत कक्षही स्थापन करण्यात आला आहे. नियम्स प्रणाली वापराबाबतची माहिती पत्रके सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नियम्स प्रणालीच्या निर्मितीकरिता योगदान दिलेल्या नैना विभागातील मंजुळा नायक, वरिष्ठ नियोजनकार, शुभांगी काळे, सहयोगी नियोजनकार आणि शुभांगी भिष्णूरकर, सहयोगी नियोजनकार यांचा उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai