Breaking News
पनवेल : प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह उरणमधील चिरनेर येथे झुडपात टाकून देणाऱ्या टॅक्सीचालकाला अटक करण्यात आल्यानंतर उरण पोलिसांनी सोहेल इस्माईल खान (वय 19) या दुसऱ्या आरोपीला या हत्या प्रकरणात अटक केली आहे.
सोहेलने टॅक्सीचालक निजामुद्दीन अली याला त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे तपासात आढळून आले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निजामुद्दीन अली हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ येथील असून तो विवाहित आहे, तसेच त्याला दोन वर्षांचा मुलगा आहे. तर मृत पूनम क्षीरसागर (वय 27) ही अविवाहित असून ती आई व विवाहित भावासोबत मानखुर्द येथे राहत होती. अली याचे पूनमसोबत प्रेमसंबंध होते. मात्र पूनम हिचे इतर व्यक्तीसोबतदेखील संबंध असल्याचा निजामुद्दीन अली याला संशय होता. याच संशयावरून निजामुद्दीन अली याने पूनमला फिरायला जाण्याच्या बहाण्याने टॅक्सीमध्ये सोबत घेतले होते. त्यानंतर त्याने पूनमची हत्या केल्यानंतर टॅक्सीतून तिचा मृतदेह मध्यरात्री चिरनेर येथे आणला. त्यानंतर त्याने मृतदेह टाकण्यासाठी त्याच्या परिचयातील सोहेल खान याला फोन केला. सोहेलने त्याला सुरक्षित जागा शोधून देत पूनमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त पूनम आणि निजामुद्दीन अली टॅक्सीमध्ये असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या हत्येमध्ये अन्य कोणीही सामील नसल्याचे स्पष्ट झाल्याचे उरण पोलिसांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai