नमुंमपा शाळांचा सरासरी निकाल 93.61 टक्के
- by Aajchi Navi Mumbai
- May 28, 2024
- 348
3 शाळांचा निकाल 100 टक्के
नवी मुंबई ः माध्यमिक शालांत (एस.एस.सी.) परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेले आहे. पालिकेच्या माध्यमिक शाळांचा एकूण सरासरी निकाल 93.61 टक्के एवढा लागला आहे. नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 116, सानपाडा येथील पूजा शिवाजी वंजारे ही विद्यार्थिनी 94.00 टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवून महानगरपालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. पालिका शाळेतील निकालातसूद्धा मुलींचाच वरचष्मा असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 23 माध्यमिक शाळांमधून 2812 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 2674 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महानगरपालिकेच्या 23 माध्यमिक शाळांमधून शाळा क्रमांक 116, सानपाडा, शाळा क्रमांक 118, पावणेगांव, शाळा क्रमांक 122, कोपरखैरणे गाव या 3 शाळांचा निकाल 100 टक्के आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांचा एकूण सरासरी निकाल 93.61 टक्के एवढा लागला आहे.
नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक 120, दिवागाव येथील वैष्णवी रमेश राठोड ही विद्यार्थिनी 93.00 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 104, राबाडा येथील विद्यार्थिनी निहारिका वर्मा आणि अर्पिता यादव त्याचप्रमाणे नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक 120, दिवागाव येथील विद्यार्थी स्वहम पीतांबर पात्रा या तिन्ही विद्यार्थ्यांनी 91.60 टक्के गुण संपादन करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांतून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai