हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागणारी महिला अटकेत
- by Aajchi Navi Mumbai
- May 30, 2024
- 525
नवी मुंबई : काही हॉटेल व्यावसायिक अवैधरितेने हॉटेल चालवत असून अनधिकृत बांधकाम केले आहे. याप्रकरणाची तक्रार पालिका, मंत्रालय स्तरावर केली असून यावरील कारवाई टाळण्यासाठी 20 लाखाची खंडणीची मागणी एका महिलेने संबंधित हॉटेल चालकांकडे केली होती. तडजोडीअंती 12 लाखांची खंडणी स्विकारताना सदर महिलेला वाशीमधून रंगेहात अटक करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील काही हॉटेल व्यावसायिकांवर अनधिकृत बांधकाम, अवैधरित्या हॉटेल चालवित असल्याची तक्रार संबंधित महिलेने नवी मुंबई महापालिकेकडे केली होती. तसेच प्रसारमाध्यमे, मंत्रालय,पालिका यांना त्यांच्या बेकायदा बांधकामाविषयी माहिती दिली असून पुढील कारवाई टाळण्यासाठी सदर महिलेने संबंधित हॉटेल चालकांकडे 20 लाखांची खंडणी मागितली. तुंगा हॉटेल येथे सदर महिला व तिचा साथीदाराशी संबंधित हॉटेल व्यावसायिकांनी भेट घेतली असता 12 लाखांवर तडजोड करण्यात आली.
वाशी येथील विहार इन हॉटेल तुंगा येथील या कॅफेमध्ये सदर महिला 29 मे रोजी खंडणी स्विकारण्यासाठी आली असता तिला मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अधिकार व अमंलदार यांच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. यामध्ये 10 हजारांच्या खऱ्या नोटा व 11 लाख 90 हजारांच्या नकली नोटा आढळून आल्या. सदर महिला व तिचा साथिदार यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशाने मध्यवर्ती गुन्हे शाखा करत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai