शैक्षणिक कर्जाची योजना अडकली लालफितीत
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 19, 2024
- 259
नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी देशांतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बँकांच्या माध्यमातून 40 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. या कर्जावरील व्याज माफ करण्यात येणार होते. जून 2023 मध्ये ही योजना प्रत्यक्षात सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, लालफितीच्या कारभारामुळे अजून त्याचा अधिकृत अध्यादेश निघू शकलेला नाही.
महामंडळाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचे. लाभार्थ्यांनी कर्जाची रक्कम भरावी व व्याज महामंडळ भरेल, अशी ही योजना होती. देशांतर्गत शिक्षण घेण्यासाठी जास्तीत जास्त 40 लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद होती. एप्रिल 2023 मध्ये महामंडळाने याविषयी प्राथमिक निर्णय घेतला. त्याविषयी पुढील सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून जून 2023 पासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याचे विचाराधीन होते. पण एक वर्षानंतरही ही योजना अस्तित्वात आलेली नाही. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही ही योजना प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे एक चांगली योजना लालफितीमध्ये अडकून पडल्याची टीका त्यांनी केली आहे. महामंडळाचे कामकाज उत्तम सुरू आहे. लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. यामुळे काही जुने कर्मचारीच अनेक अडचणी निर्माण करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai