Breaking News
मुंबई : राज्यात बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी मोठी प्रदर्शने भरविण्यात येतात. तसेच काही शहरांमध्ये "गेम झोन" आहेत. या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामध्ये वीज पुरवठ्याबाबत परवानगीचाही समावेश असतो. प्रदर्शनांची ठिकाणे, गेम झोन आदी ठिकाणी वीज पुरवठ्याबाबत असलेल्या व्यवस्थेची महावितरणमार्फत तपासणी करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
ात्रज (जि. पुणे) येथे फोरेन सिटी प्रदर्शनात आयोजनातील त्रुटीमुळे एका मुलाचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत सदस्य राहुल कूल यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य आशिष जयस्वाल, योगेश सागर, प्राजक्त तनपुरे यांनीही सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रदर्शने, गेम झोन यामध्ये वीज पुरवठ्याबाबत यापूर्वी दिलेल्या परवानगीची, तेथील वीज पुरवठ्याची तपासणी करण्यात येणार आहे. कुठेही कात्रजच्या घटनेप्रमाणे अपघात होऊ नये, याची काळजी घेण्यात येईल. विद्युत पुरवठ्याबाबत यंत्रणेतील असलेल्या दोषांबाबत, वारंवार नागरिकांना येणाऱ्या समस्यांबाबत मागील काळात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या यशापयशासंदर्भातील अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल. उपलब्ध मनुष्यबळावर महावितरण काम करीत आहे. यासोबत मनुष्यबळ उपलब्धतेसाठी कंत्राटी व्यवस्थाही उभारण्यात आलेल्या आहे. महावितरणला अधिकचा महसूल असलेल्या ठिकाणी इतर ठिकाणांपेक्षा पर्याप्त मनुष्यबळ देण्याविषयी तपासून कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai