Breaking News
देशभरातील 60 सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग; दुबईतून करत होता फसवणुक
नवी मुंबई : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 1 क कोटी 23 लाख 24 हजारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हाची उकल झाली असून सदर आरोपी सूरतमधील असून दुबईत राहून गुन्हा करत होता. हा आरोपी 26 जुन रोजी सुरत विमानतळावर आला असता त्याला ताब्यात घेण्यात आली. त्याचा देशभरातील 60 सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
6 ते 13 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये सदर आरोपींना फिर्याजी यांना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 1 कोटी 23 लाख 24 हजारांची आर्थिक फसवणुक केली होती. सदर प्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान फसवणुक करणेकरीत ावापरण्यात आलेलेल बँक खाते तसेच मोबाईल नंर यांच्या तात्रिक विश्लेषण करुन आरोपी कौशिककुमार कल्याण भाई ईटालिया, राहणार सुरत हा भारताबाहेर दुबईमध्ये राहून गुन्हा करत असल्याचे समोर आले. त्याअनुषंगाने आरोपीला लुक आऊट नोटीसवर ठेवण्यात आले होते. 26 जुन 2024 रोजी आरोपी सुरत विमानतळावर आल्याने तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सायबर पोलीस ठाण्यास कळविताच पोलीस पथक सुरतला रवाना झाले. आरोपीला दुमास पोलीस ठाणे, सुरत येथून ताब्यात घेऊन नवी मुंबईमध्ये आणून अधिक तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्याची सखोल चौकशी करणेकरीता आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीने महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यातील 60 सायबर तक्रारींमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
फिर्यादी यांनी फसवणुकीची रक्क भरलेल्या सर्व बँक खाते गोठविण्यासाठी तात्काळ पत्र व्यवहार केल्याने सदर बँक खात्यामधील एकूण 42 लाख 31 हजार 667 रु. रक्कम गोठविण्यास यश सायबर पोलीस ठाण्याला आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai