आरोग्य क्षेत्रासाठी किती तरतूद?
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2024
- 499
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केले आहे. देशातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी 90 हजार 171 कोटींची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत साधारण 12 टक्क्यांची वाढ यात करण्यात आली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरवरील तीन औषधांचे मूलभूत सीमाशुल्क माफ केले असल्याने कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तसेच आरोग्य क्षेत्रासंदर्भात काय काय घोषणा केल्या आहेत?
देशांतर्गत उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी देशातील वैद्यकीय क्षेत्रात क्ष-किरण यंत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्युब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील मूलभूत सीमा शुल्कामध्ये बदलांची रूपरेषा देखील दिली असून कॅन्सररुग्णांना लागणाऱ्या 3 औषधांच्या सीमाशुल्कात पूर्णपणे सूट देण्याची घोषणाही त्यांनी केली.
अर्थसंकल्पीय भाषणात संबोधित करताना सितारामन म्हणाल्या, कर्करोगाच्या रुग्णांना दिलास देण्यासाठी मी आणखी तीन औषधांना सीमा शुल्कातून पूर्णपणे सुट देण्याचा प्रस्ताव ठेवते. तसेच वैद्यकीय क्षेत्रात किरण मशीन मध्ये वापरला जाणाऱ्या एक्स-रेटिव्ह आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टर वरील मूलभूत कस्टम ड्युटीत बदल सुचविते,असेही त्या म्हणाल्या. हा उपक्रम आरोग्य क्षेत्रातील सुलभतेसाठी तसेच परवडणाऱ्यावैद्यकीय उत्पादन आणि नवकल्पना यांच्या सर्व समावेशक धोरणाचा भाग आहेत.
भारतात कर्करोगाचं प्रमाण वाढत असताना अर्थसंकल्पातील सीमाशुल्कात माफी मिळाल्याने कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असून कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या तीन औषधांना आकारली जाणारी 10 टक्के कस्टम ड्यूटी आता द्यावी न लागल्याने ही औषधांची किंमत कमी होणार आहे.
कोणत्या कोणत्या घोषणा करण्यात आल्या?
- सध्याच्या रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा वापर करून अधिक वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची सरकारची योजना आहे आणि समस्या तपासण्यासाठी आणि संबंधित शिफारसी करण्यासाठी एक समिती स्थापन करेल.
- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी 9-14 वयोगटातील मुलींना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करेल.
- माता आणि बाल आरोग्य सेवेसाठी विविध योजना एका व्यापक कार्यक्रमांतर्गत आणल्या जातील, ज्याच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधला जाईल. लसीकरणासाठी नवीन डिझाइन केलेले-प्लॅटफॉर्म आणि मिशन इंद्रधनुषचे तीव्र प्रयत्न देशभरात आणले जातील.
- एक्स रे मशीनमधील धातूंच्या आणि संबंधित मशीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या भागांवरील सीमाशुल्क कमी होणार
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai