सर्वेक्षणाच्या आश्वासनानंतर चौगुले यांचे उपोषण स्थगित
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2024
- 346
नवी मुंबई ः झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्यावरुन भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेनेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी पुकारलेले उपोषण तीसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे. सोमवारपासून नवी मुंबईतील झोपडपट्टीचं सर्वेक्षण केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
नवी मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत बायोमेट्रिक सर्वेक्षण 31 जुलैपर्यंत सुरु न केल्यास 1 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा 15 दिवसांपुर्वीच चौगुले यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी दिघा चिंचपाडा येथे उपोषणा सुरु केले होते. माझं उपोषण सरकारच्या विरोधात नसून हे उपोषण स्थानिक आमदाराच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं हेोते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी खासदार नरेश मस्के यांच्या मध्यस्तीने सोमवारपासून नवी मुंबईतील झोपडपट्टीचं सर्वेक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर
यावेळी बोलताना खासदार नरेश मस्के म्हणाले की, विजय चौगुले झोपडपट्टीवासीयांना हक्काचं घर मिळावं, यासाठी उपोषणाला बसले होते. एसआरएची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतेय. मात्र, नवी मुंबईत झोपडपट्टी सर्वेक्षण बंद झाल्यानं त्याविरोधात ते उपोषण करत होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून मला या ठिकाणी पाठवलं. एसआरए अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून मुख्य सचिव उपोषणस्थळी आले होते. चौगुले यांच्या उपोषणाला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिल्यानं संपूर्ण दिघा, ऐरोली आणि रबाळेत बंद पाळण्यात आला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai