Breaking News
7.50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई ः खारघर वसाहतीमधील सेक्टर 35 ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात दोन आठवड्यांपुर्वी रात्री 10 वाजता तीन चोरांनी रिव्हॉल्व्हर घेऊन सूमारे 11 लाख 80 हजारांचे सोन्याचे चांदीचे दागिने लुटून नेले. तांत्रिक तपासाद्वारे यातील चार आरोपींना राजस्थान येथून अटककेली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खारघर सेक्टर 35 ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात 29 जुलै रोजी रात्री 10 वाजता तीन चोरांनी हेल्मेट घालून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हवेत गोळीबार करुन 11 लाख 80 हजारांचे सोन्याचे चांदीचे दागिने लुटून नेले. ही सर्व घटना सराफाच्या दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. सराफ दुकानदाराने सायरन वाजवून मदत मागण्याचा प्रयत्न केला तरी कोणतीही मदत मिळाली नाही. परंतू सायरनच्या धाकेमुळे अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी हाताल लागेल तेवढे दागीने घेऊन चोरांचे त्रिकुट दुचाकीवर बसून पसार झाले.याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून आरोपी येण्याच्या व जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची 8 दिवस पाहणी केली. तांत्रिक तपासाद्वारे गुन्ह्यातील 4 आरोपी निष्पन्नझाल्याने गुजरात, राजस्था, नेरळ, माथेरान याठिकाणी पोलीस पथके पाठवले. यातील उद्यपुर, राजस्थान येथून 4 आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. मे.रिझवान मो अलीशेख अझरुद्दीन हुसनोदीन शेख, ताहा तनवीन परवेझ सिंधी, राजविर रामेश्वर कुमावत अशी आरोपींची नावे आहेत. 16 ऑगस्ट रोजी त्यांना अटक केली असून न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 2 अग्निशस्त्रे, 3 जीवंत काडतुसे, मोटारसायकल, गोल नकलेस हार, गळ्यातील हार, पेन्डट, गोप चैन, गोल हार, 7 बांगड्या, ब्रेसलेट, काळेमणी असलेले मंगळसुत्र 2, 2 वाटीचे मंगळसुत्र असा एकुण 7 ला 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai