Breaking News
उरण ः आपल्याच मित्राशी पत्नीचे जुळलेल्या प्रेमसंबंधामुळे संतप्त झालेल्या पतीने मित्राचा डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली. इतक्यावर न थांबता त्याने मित्राचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत घालून काळोखात फेकून दिल्याची घटना जासईत घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे उरण तालुक्यासह जासई परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी बालगंधर्व रामचंद्र गोडस (42) आणि मयत दत्तात्रेय महादेव बुटूकडे (40) हे दोघेही चालक म्हणून एकाच कंपनीत काम करीत असल्याने त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. मैत्री असल्याने मयत दत्तात्रेयचे त्याच्या घरी येणे जाणे होते. यादरम्यान आरोपीच्या पत्नीशी दत्तात्रेयचे प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांनंतर पत्नी आणि मित्रांमध्ये सुरू असलेल्या प्रेमप्रकरणाची कुणकुण पतीला लागली. यामुळे बऱ्याच दिवसांपासून मनातुन बैचेन व संतापलेल्या आरोपी बालगंधर्वने दत्तात्रेयचा काटा काढण्यासाठी संधी शोधत होता. त्यानुसार त्याला जेवायला घरी बोलावले. रात्री जेवण झाल्यानंतर आरोपी बालगंधर्वने दत्तात्रेय याच्या डोक्यावर दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे पत्नीच्या मदतीने दत्तात्रेयचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून नजीकच्याच शाळेतील शौचालयाच्या बाजूला असलेल्या गवतात टाकून दिला. सकाळी प्लास्टिकच्या गोणीत काहीतरी संशयास्पद असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. खबर मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.प्लास्टिकची गोणी उघडून पाहताच त्यामध्ये पुरुषाचा मृतदेह आढळला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना संशयित आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी आरोपी बालगंधर्व व त्याची पत्नी चांगुणा यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai