Breaking News
3 लाख 16 हजाराची रोख रक्कम लंपास
नवी मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त सुट्टी असल्याने चोरट्यांनी संधी साधुन शिरवणे एमआयडीसीतील बंद असलेले दोन कार शोरुम फोडून त्यातील 3 लाख 16 हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
शिरवणे एमआयडीसीमध्ये टाटा मोटर्स शोरुम व मारुती सुझुकी कंपनीच्या ऍटोमोटीव्ह मॅन्युफेक्चरर्स प्रा.लि.चे भव्य शोरुम आहेत. मंगळवारी अनंत चतुर्दशीनिमित्त या दोन्ही शोरुममधील कर्मचाऱयांना सुट्टी असल्याने दोन्ही शोरूम बंद होते. त्याची संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही शोरुमचे दरवाजे व कडी कोयंडे तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच या शोरुच्या कपाटातील रोख रक्कम चोरुन नेली.
बुधवारी सकाळी या शोरुममधील कामगार कामावर आल्यानंतर दोन्ही शोरुमचे कडी कोयंडे व दरवाजे तोडण्यात आल्याचे तसेच आत मध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. तसेच कॅश काऊंटरमधील रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळून आले. चोरट्यांनी टाटा मोटर्स शोरुममधुन 1 लाख 96 हजाराची रोख रक्कम तर ऍटोमोटिव्ह मॅन्युफेक्चरर्स प्रा.लि. च्या मारुती सुझुकी कंपनीच्या शोरुममधुन 1 लाख 20 हजाराची रोख रक्कम चोरुन नेल्याचे आढळून आल्यानंतर या दोन्ही शोरूम मधील कर्मचाऱ्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai