Breaking News
नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन नायजेरीयन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी सांयकाळी छापा मारुन अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याकडुन तब्बल 75 लाख 68 हजार रुपये किमतीचा 302 ग्रॅम वजनाचा कोकेन आणि एमडीचा (मॅफेड्रॉन) साठा जप्त केला आहे. या तिघांनी सदर अंमली पदार्थांचा साठा कुठून आणला याबाबत पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.
अंमली पदार्थाची तस्करी करणारे तीन नायजेरीन नागरीक कोपरखैरणे येथील पोशिरदेवी म्हात्रे कुलदैवत मंदीराजवळच्या गल्लीत कोकेन व एमडी पावडरची गिऱ्हाईकांना विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, निलेश धुमाळ, सचिन कोकरे व त्यांच्या पथकाने गत शनिवारी सायंकाळी कोपरखैरणेतील पोशिरदेवी म्हात्रे कुलदैवत मंदीराजवळच्या गल्लीत छापा मारला. तसेच सिल्वासा नाचोर, इझिके ओगुगुआ व संडे इझीओबी या तीन नायजेरीयन व्यक्तींची धरपकड केली.
त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ 25 लाख 38 हजार रुपये किंमतीचे 101 ग्रॅम वजनाचे मेफड्रॉन पावडर तसेच 50 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 201 ग्रॅम वजनाचे कोकेन असा एकुण 75 लाख 68 हजार रुपये किमतीचा 302 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थांचा साठा आढळुन आला. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन नायजेरियन व्यक्तींना अटक करुन त्यांच्याजवळ सापडलेला 302 ग्रॅम वजनाचा कोकेन व एमडी पावडरचा साठा जप्त केला आहे. या तिन्ही नायजेरीयन नागरिकाविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात एनडीपीएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai