संदीप नाईक यांनी बेलापुरमधून फुंकली तूतारी
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 23, 2024
- 430
नवी मुंबई ः निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षात जागा वाटपावरुन रणकंदन सुरु झाले आहे. तिकीटासाठी बंडखोरी, पक्षांतर असे अनेक फंडे आजमावले जात आहेत. नवी मुंबईतही त्याचा प्रत्यय आला असून भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने पक्षाचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांनी पक्षाचा तसेच जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देवून विधानसभा निवडणुकीसाठी बेलापुर मतदारसंघातून तूतारी फुंकली आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी संदीप नाईक यांनी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु केले होते. मात्र भाजपने आ.मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केल्याने संदीप नाईक यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या नाईकांनी मंगळवारी निर्धार मेळावा घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने पक्ष सोडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निर्धार मेळाव्यात संदीप नाईक म्हणाले, 2019 मध्ये परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला निर्णय घ्यावा लागला होता. नवी मुंबईच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. आमच्या नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं, दीर्घ आणि प्रलंबित विषय सत्तेत असल्याशिवाय निर्णय होत नाही. हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत, हे मार्गी लागण्याकरता त्यावेळी निर्णय घेतला गेला. परंतु, आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिलेला शब्द फिरवला गेला. त्यामुळे काही अंशी माझी कोंडी झाली. माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली नाही पाहिजे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai