दशकानंतर नवी मुंबईला मंत्रिपद
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 20, 2024
- 712
नवी मुंबई : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले होते. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यात ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांची कॅबिनेटमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईला दहा वर्षानंतर पुन्हा कॅबिनेटमंत्री पद मिळाल्याने नाईक समर्थकांमध्ये उत्साह पसरला आहे.
महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये झाला. नागपूरच्या राजभवनात महायुतीमधील एकूण 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे आ.गणेश नाईक यांनी यांचाही समावेश होता. गणेश नाईक हे 1995 पासून 7 वेळा निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत असताना तीन वर्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना दहा वर्ष पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी जनता दरबार हा प्रयोग राज्यात राबवला. त्यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिका कायम त्यांच्या ताब्यात राहीली आहे. नवी मुंबईतील गणेश नाईक यांची भारतीय जनता पक्षाचे ताकदवान नेते अशी ओळख आहे. त्यांचे वर्चस्व आणि कामगिरी पाहता पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली आहे. गणेश नाईक हे भाजपमध्ये येण्यापूव शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2019 मध्ये गणेश नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व आमदार म्हणून निवडून आले. महायुतीचे सरकार 2022 साली सत्तेत आल्यावर त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा नवी मुंबईकरांना होती परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हट्टामुळे त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही असे बोलले जाते. पण आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून ही शपथ ग्रहण केल्यानंतर गणेश नाईक यांना कोणतं खातं मिळतं? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश नाईक यांना पहिल्याच टप्प्यात मंत्रिपद देवून नवी मुंबईतील शिंदे समर्थक नेते व भाजपातील विरोधी नेते यांना योग्य संदेश दिला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai