विहिघर व कुंडेवहाळला आमदार चषक

पनवेल ः विहिघर येथे ओम साई दोस्ती क्रिकेट संघ यांच्यावतीने आमदार चषक 2020 तसेच कुंडेवहाळ येथे निकेश भास्कर स्पोर्टस असोसिएशनद्वारे उरण पनवेल आमदार चषक आणि सरपंच चषक 2020 चे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांचे उदघाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.  या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर, सुनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.