तीन श्रेणींमध्ये रंगली मिसेस नवी मुंबई सौंर्द्य स्पर्धां
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2025
- 732
नवी मुंबई ः डीएस एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मिसेस नवी मुंबई’ सौंदर्य स्पर्धेचा दहावे पर्व वाशीच्या सिडको सभागृहात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात पार पडले. तीन श्रेणींमध्ये विभागलेल्या या स्पर्धेमध्ये पारंपरिक आणि पाश्चात्त्य अशा दोन रोमांचक फेऱ्यांमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धकांनी आपली चुणूक दाखवली.
दीपक शेट्टी यांच्या डीएस एंटरटेन्मेंटने सलग 10 वर्षे यशस्वीरीत्या या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करून सौंदर्य स्पर्धांच्या जगात एक नवीन मैलाचा दगड रोवला आहे. दरवर्षीय स्पर्धेसाठी नवी मुंबईतून मोठ्या संख्येने स्पर्धक भाग घेत असतात. यंदा या स्पर्धेत तीन विशिष्ट श्रेणी होत्या, ज्यामध्ये प्रीमियम (40 वर्षांपेक्षा कमी), क्लासिक (40 ते 50 वर्षे) आणि सुपर से उपर (50 वर्षांपेक्षा जास्त) अशा तीन श्रेणींचा समावेश होता. यात पारंपरिक आणि पाश्चात्त्य अशा दोन रोमांचक फेऱ्यांमध्ये सहभाग नोंदवून स्पर्धकांनी आपली चुणूक दाखवली. पारंपरिक फेरीत स्वपरिचयाचे, तर पाश्चात्त्य फेरीत प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले होते. यातून अंतिम फेरीसाठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे ‘सकाळ’ माध्यम समूहाचे युनिट व्यवस्थापक संदीप विश्नोई यांचा स्पर्धेच्या परीक्षक पॅनेलमध्ये समावेश होता. त्याशिवाय डॉ. संजीव कुमार (एसके ग्रुप), अशोक मेहरा (मालक, शिकारा), सौम्या सिंग (संस्थापक, ड्रीमझ मेकर्स आणि सह-संस्थापक, इमोडा) आणि आरती पानसरे (मिसेस नवी मुंबई 2022) यांनी परीक्षक म्हणून भूमिका पार पाडली.
‘मिसेस नवी मुंबई’ सर्व स्तरातील महिलांसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करीत आहे. या माध्यमातून महिलांचे सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सशक्तीकरणासाठी मोठे काम केले जात असून हा प्रवास असाच अविरतपणे सुरू राहील, असे आयोजकांनी सांगितले. विजेत्या स्पर्धकांचा ‘मिसेस नवी मुंबई’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. उत्कृष्ट आणि सगळ्यात उठावदार कामगिरी करण्याऱ्या स्पर्धकांना ‘क्वीन ऑफ नवी मुंबई’ पुरस्कार देऊन राणीचा मुकुट प्रदान आला.
प्रीमियम श्रेणी
- विजेती मीनाक्षी पांचाळ
- प्रथम उपविजेती रोशनी तांबोळी
- दुसरी उपविजेती नम्रता मेहता
क्लासिक श्रेणी
- विजेती डॉ. लीना पवार
- पहिली उपविजेती हीना मुकादम
- दुसरी उपविजेती सीता मिश्रा
सुपर से उच्च श्रेणी
- विजेती अलिफिया आबिद
- प्रथम उपविजेती - ॲड. रुपाली काकडे
- दुसरी उपविजेती - डॉ. दिपा बोबडे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai