Breaking News
महिलांविषयक गुह्यांमध्ये घट, आर्थिक फसवणुकीमध्ये वाढ
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये महिलांविषयक, शरिराविरद्ध, मालमत्ताविषयी गुन्ह्यांमध्ये घट झाली असून आर्थिक फसवणुक, इतर गुन्हे व अमंलबाजवणीची प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आकडेवारीवरुन गुन्हे उघडकिस आणण्याच्या प्रमाणात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र सायबर गुन्ह्यांचा आलेख चढता असून त्याची उकल करण्यासही फारसे यश आलेले नाही.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांची व त्यांच्या उकलीची आकडेवारीचा तपशील प्रसारमाध्यमांना देण्यात आला. गत वर्षात वेगवेगळे उपक्रम राबवून पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी एकही घटना घडली नाही. 2025 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने कार्यपद्धती ठेवून नागरीकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2024 मध्ये शरीराविरुद्धच्या एकुण 797 दाखल गुह्यापैकी 785 (98टक्के) उघडकीस आले आहेत. तसेच मालमत्ता विषयक दाखल 2250 गुह्यापैकी 1176 गुन्हे (52 टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. सन 2024 मध्ये आर्थिक फसवणूकिचे 823 गुन्हे घडले असून त्यापैकी 421 गुन्हे (51टक्के) उघडकिस आले आहेत. तसेच महिलांविषयक दाखल 626 गुन्ह्यांपैकी 616 (98टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच इतर 1510 गुह्यांपैकी 1317 (87 टक्के) गुन्हे त्याचप्रमाणे अंमलबजावणीचे 1363 दाखल गुह्यांपैकी 1362 गुन्हे (100टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. या एकुण आकडेवारीवरुन नवी मुंबई पोलिसांची 2023 वर्षाच्या तुलनेत 2024 मध्ये गुन्हे उघडकिस आणण्याच्या प्रमाणात 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai