कोपरखैरणेत अतिक्रमणांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 05, 2025
- 531
नवी मुंबई ः महापालिकेच्यावतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात अतिक्रमण विभागाने कोपरखैरणेत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यातील एका कारवाईतील संबधितांकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी रू.25,000 वसूल करण्यात आले.
नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत भू.क्र.17, सेक्टर-14, कोपरखैरणे, नवी मुंबई येथील अनधिकृत पत्राशेडला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 55 अन्वये नोटीस बजावून हटविण्यात आली. घर नं.23, खैरणेगाव, तलावाशेजारील अनधिकृत बांधकामास नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली व संबधितांकडून अनधिकृत बांधकाम हटविणेपोटी रू.25,000 वसूल करण्यात आले.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल काठोळे व विभाग कार्यालयातील (अतिक्रमण विभागातील) अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. मुख्यालय स्तरावरून पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आलेला होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai