अनधिकृत बांधकामावर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2025
- 216
नवी मुंबई ः महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत अतिक्रमण विभागाने कोपरखैरणे व घणसोली विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभाग अंतर्गत एस एस टाईप, रूम नंबर 200, 201 आणि 202, सेक्टर 17, कोपरखैरणे, यांच्या बांधकामास दि. 04 मार्च 2025 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात असून, दंडात्मक शुल्क प्रत्येकी रु.10,000 दंड वसूल करण्यात आला. तसेच रूम नंबर 932, सेक्टर 4, कोपरखैरणे रूमच्या मागील बाजूस जागा बंदिस्त करून भिंत बांधण्यात आलेली होती. ती भिंत निष्काशीत करण्यात आली. कोपरखैरणे शिवमंदिर, पावणे गाव या ठिकाणी पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे साहित्य जप्त करुन कोपरखैरणे क्षेपणभूमी या ठिकाणी जमा करण्यात आले. सदर अनाधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
नवी मुंबई महापालिका विभाग कार्यालय घणसोली अंतर्गत माँ शेरावाली बंगल्यासमोर, गोठीवली गाव, येथील आरसीसी तळमजला पुर्ण् + 1 मजल्याचे काम प्रगतीपथावर होत. पालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदर अनधिकृत बांधकामावर नवी मुंबई महापालिकेकडून तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai