Breaking News
नवी मुंबई ः गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणना केली जावी अशी मागणी केली जात होती. याच मागणीबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आगामी जगणननेसोबतच जातीनिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची (23 एप्रिल) बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयांमध्ये जातिनिहाय जनगणनेच्याही निर्णयाचा समावेश आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीत काय-काय झालं, याचा आढावा माध्यमांसमोर मांडला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली.
गेल्या अनेक दिवासापासून विरोधकांकडून देशात जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसारख्या देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षाने हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने याला प्रचाराचा मुद्दा बनवला होता. आम्ही सत्तेत आलो तर देशभारत जातनिहाय जनगणना केली जाईल, असे आश्वासन विरोधकांनी दिले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai